कामीनी ट्रॅव्हल - भाग ३७

  • 1.7k
  • 807

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३७ प्रदीप दवाखान्यात आल्यावर प्राची त्याला डाॅक्टर काय म्हणाले ते सांगते. "आता काळजी करू नकोस.आणि काकूंना खूप दवाखान्यात ये जा करू देऊ नकोस. त्यांनाही जपायला हवं. मी आता निघते." प्राची म्हणाली. " हो ताई तुम्ही निघालात तरी चालेल. तुम्ही दवाखान्यात होता म्हणून मी आईकडे बघू शकलो. तुमचे किती धन्यवाद मानू." बोलताना प्रदीपचा आवाज गहिवरला. "अरे धन्यवाद कसलेदेतोस. आपले खूप जुने संबंध आहेत. आईसमोर तू धीर सोडू नको.ठीक चल निघते." " ताई गाडीच्या चाव्या." "अरे हो.दे" प्राची गाडीच्या किल्ल्या घेऊन दवाखान्यातून निघते. *** गाडी चालवताना पुन्हा तिच्या डोक्यात दुपारसारखेच काही बाही विचार पिंगा घालू लागले. प्राची गाडी यंत्रवत