कामीनी ट्रॅव्हल - भाग ३५

  • 1.3k
  • 717

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३५ काल दवाखान्यात भय्यासाहेबांजवळ कोणाला थांबू देत नव्हते.पण तरी प्रदीप थांबला होता.प्राचीनही त्याला थांबू दिलं. प्राची संध्याकाळी कामीनी बाईंना घेऊन घरी आली येण्यापूर्वी कामीनी बाईंनी बाहेरूनच भय्यासाहेबांना बघीतलं. आज प्राची कामीनी बाईंच्याच खोलीत झोपणार असते. कारण अजूनही त्यांना थकवा असतो. तन्मयला हर्षवर्धनच्या खोलीत झोपायला सांगते. तन्मय आजच्या दिवसांतच एकदम मोठा होतो. आपण हट्ट करून आजोबांना बगीच्यात नेलं नसतं तर हे घडलं नसतं. याची टोचणी त्याला लागते. वरुन तो शांत दिसत असला तरी त्याच्या मनात खूप खळबळ माजलेली असते.तो हळूच पाय न वाजवता हर्षवर्धनच्या खोलीत जातो. *** प्राची कामीनी बाईंना हळूच पलंगावर बसवते. नंतर हळूहळू त्यांना पलंगावर झोपवले.