कामीनी ट्रॅव्हल - भाग ३४

  • 1.5k
  • 720

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३४ प्राची ऑफीससाठी जशी घराबाहेर पडली तसा तन्मय भय्यासाहेबांपाशी आला आणि म्हणाला "आजोबा आपल्या घराजवळच्या बगीच्यात जाऊ. माझे सगळे मित्र आलेत तिथे. त्यांना तुमच्याकडून डिटेक्टीव्ह स्टोरी ऐकायची आहे.चलानं" तन्मय गयावया करू लागला. हे त्यांचं बोलणं कामीनी बाईंनी ऐकलं आणि हातातलं काम तसंच ठेऊन त्या समोरच्या खोलीत आल्या. "तन्मय आईनी काय सांगीतलं आहे लक्षात आहे नं? का विसरलास?" " आजी बगीचा तर घराजवळच आहे. आज शंकर नाही प्रदीपदादा आहे नं!" " नको. प्राची नाही जायचं म्हणाली नं मग नको." कामीनी बाईं ठामपणे म्हणाल्या.तसा तन्मयचा चेहरा पडला. त्याचा पडलेला चेहरा बघून भय्यासाहेबांना वाईट वाटलं.ते म्हणाले. "अगं घराजवळच आहे बगीचा