कामीनी ट्रॅव्हल - भाग ३३

  • 1.4k
  • 697

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३३ संध्याकाळी प्राची घरी आली तेव्हा ती थकल्यासारखी दिसत होती कारण तिची आज खूप धावपळ झालेली असते. तिला भय्यासाहेब म्हणाले, " आजच तू टूरवर गेलीस आणि लगेच परत यावं लागलं नं त्या विश्वास मुळे? मला कामीनीने सांगितलं या विश्वास आणि दिनूचा आता कायमचा बंदोबस्त करावाच लागणार." भय्यासाहेबांना प्राची सोफ्यावर बसत सांगू लागली. "भय्यासाहेब आज विश्वास आपल्या गुंड मित्राला घेऊन ऑफीसमध्ये आला होता. मी जाण्यापूर्वी यादव आणि संदीपला सांगून गेले होते की काही झालं तर लगेच मला कळवा.मला मनातून वाटतच होतं की हा विश्वास नक्की काहीतरी गोंधळ करणार आहे." थोडं थांबून प्राचीने पुढे म्हणाली, "यादव मला फोन करणार