कामीनी ट्रॅव्हल - भाग ३१

  • 1.8k
  • 924

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ३१ सकाळी सकाळी कामीनी बाईंच्या आईचा फोन आला. तीही कामीनी बाईंना खूप सुनवायला लागली..कामीनी बाईंच्या आईचा आवाज मुळात चिरका होता आता तर रागानी आणखी चिरकला. "काय ग दिनूला काल काय वाट्टेल ते बोललीस. लाज नाही वाटत. मामा आहे तुझा तो. त्याच्यामुळे तुझं त्या श्रीमंत भय्यासाहेबाशी लग्नं झालं आता त्यालाच उलटून बोलते. त्याने तुझ्याकडे थोडे पैसे मागीतले तर काय बिघडलं?" "आई ओरडायची गरज नाही. दिनूमामामुळे माझं लग्नं जमलं हे तू मला आयुष्य भर ऐकवणार आहेस का? आणि का म्हणून त्याला मी सतत पैसे देऊ? मला माझा. संसार नाही का?" " वा ! आता फार जोर आला तोंडात.आजपर्यंत तर