कामीनी ट्रॅव्हल - भाग २९

  • 1.6k
  • 837

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २९ काही वर्षांनंतर… कामीनी ट्रॅव्हल्स आता ट्रॅव्हल्सच्या क्षेत्रात सिनीयर झाली होती. निसर्ग नियमानुसार सगळ्यांची वयं वाढली होती. भय्यासाहेब ऐंशीच्या घरात होते तर कामीनी बाई त्यांच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असल्या तरी त्याचीही पंच्याहत्तरी झाली होती. हर्षवर्धन पन्नाशीच्याजवळ पोचला होता आणि प्राची पन्नाशीच्या आत होती. प्राची हर्षवर्धनचा मुलगा तन्मय आता पंधरा वर्षांचा होता.लग्नांतर बरेच वर्षांनी प्राची हर्षवर्धन आई-बाबां झाले होते. प्राचीच्या बाबांनी दोन वर्षापूर्वी कामीनी ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये येणं सोडलं होतं. त्यांचही वय झालं होतं. तन्मय यंदा दहावीच्या वर्गात होता. त्याचा अभ्यास, त्याच्या ट्युशन त्याचे मित्र या सगळ्यात म्हणजे तन्मयच्या जगात त्याचे आजी आजोबा म्हणजे भय्यासाहेब आणि कामीनी बाईं जातीनं