येरा गबाळ्याचे काम नोहे

  • 2.7k
  • 1
  • 918

येरा गबाळ्याचे काम नोहे ....... आम्ही लास्ट इयरला असताना गोगटे कॉलेजमध्ये इंग्रजी प्रिन्सिपल ला विद्यार्थ्यांच्या संख्येचं रेकॉर्ड झालं. एरव्ही शिकस्तीने 6 ते 8 एवढीच मुलं असायची. पण आमच्या बॅचला चक्क 18 स्टुडंटस् झाले. एस.य. ला 22 मुलं होती . पण टी.वाय. ला फक्त 9 जणानीच इंग्रजी प्रिन्सिपल घेतलं. मुंबई युनिवर्सिटीचे रिझल्ट फार कडक, जेमतेम निम्मीशिम्मी बॅच उद्धरायची. म्हणून बरीच मुलं इतिहास, सोशोलॉजी, मराठी, हिंदी हे विषय घेवून बी.ए. करीत. चिपळूण आणि सावंतवाडी ला इंग्रजी प्रिन्सिपलची सोय नव्हती म्हणून त्या कॉलेजमधली 7 मुलं गोगटे कॉलेजला आलेली. तसेच बी.अ‍ॅण्ड सी. मध्ये रायगडचे एक्झिक्युटीव इंजिनीअर नेवग़ी बदली होवून रत्नागिरीला आले त्यांची मुलगी कांचन