कामीनी ट्रॅव्हल - भाग २

  • 2.9k
  • 1.9k

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २रा मागील भागावरून पुढे. मागील भागात आपण बघीतले की कामीनी ट्रॅव्हल्स ला पुन्हा एकदा पुरस्कार मिळाल्याने कामीनी बाई,प्राची आणि हर्षवर्धन आनंदात आहेत.बघूया आता काय होईल... कार्यक्रमात असूनही प्राची नसल्यासारखीच होती. ती भूतकाळात कधी शिरली तिलाच कळलं नाही. त्यादिवशी पाटणकरांकडे सकाळपासून धावपळ सुरु होती. कारण प्राचीला बघायला मुलाकडची मंडळी येणार होती. प्राचीनी आज साडी नेसावी असं तिच्या आईचं वासंतीचं म्हणणं होतं तर प्राचीचं म्हणणं होतं. "आई आता तुझ्यावेळचा काळ राहिला नाही.मी सुटसुटीत ड्रेस घालीन " " होका मग घाल जीन पॅन्ट आणि टी शर्ट किंवा टाॅप." असं वासंतीनं म्हटल्याबरोबर प्राचीनं जागच्या जागी उडीच मारली. "आई खरच घालू. किती