राधिका अनंत आणि बंड्या

  • 3.9k
  • 1.8k

राधिका अनंत आणि बंड्या राधिका भल्या पहाटेच उठली. अनंत अजून घोरतच होता. रुखवतात आलेलं समान बेडरूम मध्ये एका कोपऱ्यात ठेवलं होत. त्यातल्या साखरेच्या रूखवताला मुंग्या लागल्या होत्या. रंगी बेरंगी घोटीव कागद पुठ्ठ्यावर चिकटवून सजवलेली काव्यमय सप्तपदी, शोच्या बाहुल्या, खेळण्यातली बैलगाडी, प्लास्टिक मध्ये व्यवस्थित पॅक केलेले फराळाचे जिन्नस, मैत्रिणींनी हौसेने केलेले हलव्याचे दागिने, गुलाबी आणि हिरव्या रंगात ‘राधिकास आंदण’ असं लिहिलेलं गोदरेज कपाट आणि वॉशिंग मशीन हे सर्व पाहून माहेरच्या आठवणीने तिला भडभडून आलं. बेडखाली ठेवलेली तिची बॅग तिने बाहेर ओढली. बॅगेतून टूथब्रश, कपडे घेऊन ती बाथरूम मध्ये गेली. आर्ध्या तासाने बाहेर येऊन खांद्यावर पिळून ठेवलेली साडी आणि टॉवेल कुठं वळत