कोण? - 20

  • 4.1k
  • 2.1k

भाग – २० मग साहेब उत्तरले, “ हे बघ सावली आमचे कामच असते संशय करणे, त्या संशयाचा जोरावर आम्ही आमचा ध्येयाचा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आम्ही तक्रार करणारा आणि अपराधी या दोघांवरही आधी संशय करतो आणि आपल्या तपास सुरु करतो. त्यानंतर जसजसा तपास पुढे पुढे वाढतो आणि आम्हाला पुरावे मिळत जातात. त्यानुसार आम्ही संबंधित व्यक्तीची उलट तपासणी करतो, तो मग तक्रार करणारा असोत कि मग अपराधी. त्याच अनुषंगाने माझा तपास सुरु होता. तुझावर संशय आम्हाला तेव्हा आला जेव्हा त्या घटना स्थळापासून निघालेला श्वान पथक इस्पितळाचा पायरीपर्यंत येऊन परत फिरला. परंतु नंतर तो इस्पितळाचा मागील बाजूस जाऊन तिथल्या तिथे थांबला.