मला स्पेस हवी पर्व २ भाग ३२

  • 1.5k
  • 768

मला स्पेस हवी पर्व २ भाग ३२ या भागात नेहा खूप दिवसांनी माहेरी जाणार होती.तिथे काय घडेल बघू.नेहा, सुधीर, ऋषी ,आणि सुधीरचे आई-बाबा नेहाच्या माहेरी जेवायला गेले होते. तिथे आपली आई काहीतरी कुरबुर काढेल याची शंका नेहाला होती आणि झालंही तसंच. नेहाची आहे तिला म्हणाली ,"काय ग काय गरज होती इतक्या लांब जायची? आणि तुला काय ती स्पेस हवी होती ती तिथे मिळाली का? एकट राहण्यात काय मजा असते ? कुटुंब हवं की नको? तुझा लहान मुलाचा सुद्धा तू विचार केला नाहीस आणि इतक्या लांब गेलीस. आम्ही बायकांनी इतक्या वर्ष संसार केला आम्हाला नाही वाटलं कधी की स्पेस हवी म्हणून.