मला स्पेस हवी पर्व २ भाग ३१

  • 1.4k
  • 726

मला स्पेस हवी पर्व २ भाग ३१मागील भागात आपण बघीतलं की नेहा आल्यामुळे घरातील सगळे आनंदी झाले. आता पुढे बघू.“आई मला दोष्त शांग.”ऋषी गोष्ट सांग म्हणून नेहाच्या मागे लागला. नेहाने पण लाडाने त्याला कुशीत घेतलं आणि म्हंटलं,“ सांगते हो पिल्लू कोणची सांगू ?”यावर ऋषी म्हणाला,“ आजोबा सांगतात तीच गोष्ट सांग.” यावर नेहाला हसायला आलं ती म्हणाली,“ ठीक आहे तुला ताडोबाची गोष्ट ऐकायची आहे ना सांगते.”नेहा हावभाव करून ऋषीला गोष्ट सांगू लागली. ऋषी लाडांनी वेगवेगळे आवाज काढत होता. ऋषी आणि नेहाचं हे लडीवाळ प्रेम सुधीर डोळ्यात साठवून घेत होता. कितीतरी महिने झाले सुधीरला नेहा आणि ऋषीचं हे रूप बघायलाच मिळालं नव्हतं.