श्रेष्ठ कोण?

  • 2.2k
  • 1
  • 921

श्रेष्ठ कोण? अलिकडील काळात मी मोठा मी मोठाच असं म्हटलं जातं. जणू मोठेपणाची स्पर्धाच लागलेली आहे. अशाच मोठेपणाच्या स्पर्धेत काही पैशांचे पेशेवर प्रतिनीधी. त्याची सभा भरलेली होती. त्या सभेत ते आपापली माहिती सांगत होते. त्या सभेत ठरणार होतं की मोठं कोण? त्या सभेत डॉक्टर, इंजिनीअर, संस्थाचाल, एक लहानसा विद्यार्थी, न्यायाधीश, वकील, शिक्षक, कामगार व शेतकरी असे बरेच जण होते. सगळ्यांनी आपआपली माहिती सांगीतली व मोठेपणाचं वर्णन केलं. सर्वात प्रथम क्रमांक शेतकऱ्याचा आला. त्याचा चेहरा बसला होता. हाडांना मांस चिकटलेलं होतं. बोलतांना त्राण लागत होता. तरीही तो बोलत होता. त्यानं आपलं धोतर सवारलं व बिचारा बोलला, "मी शेतकरी. मी मोठाच आहे.