शाळेची पटसंख्या तुटली? कारण काय

  • 2.3k
  • 891

शाळेची पटसंख्या तुटली? कारण काय? *अलिकडील काळात संस्थाचालकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचं कारण म्हणजे घटनेत असलेली तरतूद. त्या तरतुदीनुसार तोच शाळेतील शिक्षकांची नियुक्ती करु शकतो व तोच त्यांचं निलंबन करु शकतो. तो शाळेचा व्यवस्थापन सचीव म्हणून काम करीत असतो व तोच शाळा समितीचा अध्यक्ष म्हणूनही काम करीत असतो आणि तोच संस्थेचा सचिव म्हणूनही काम करतो. पर्यायानं सांगायचं झाल्यास तो एकाचवेळेस शाळेतील तिन्ही पदावर काम करीत असतो.* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं. त्यावेळेस त्यांनी शिक्षणाचा विचार केला. परंतु त्यापुर्वीही सरकारी शाळा अस्तित्वात होत्या व काही खाजगी शाळाही होत्या. सरकारी शाळा या इंग्रजी मक्तेदारीच्या होत्या, तर खाजगी शाळा या अखंड भारतीय लोकांच्या