महिला कमजोर? होवूच शकत नाही

  • 2.5k
  • 1
  • 942

महिला कमजोर? होवूच शकत नाही? एक महिला. एका महिलेत एवढी शक्ती असते की ती राजाला रंग करु शकते आणि तीच रंकाला राजाही. अलिकडे महिला कमजोर कमजोर म्हणत महिला सक्षमीकरणाचे वारे सुरु आहेत. कधी गॅसचं कनेक्शन घ्यायचं असल्यास महिलांच्या नावानं, कधी राशन कार्ड बनवायचं असल्यास महिलांच्या नावानं आणि आता मुख्यमंत्री लाडली बहिण योजना. महिलांना समर्पीत. यावरुन महिलांना शासन कमजोर समजत असल्याचं चित्र दिसतं. खरंच महिला कमजोर आहे का की तिला कमजोर समजून हिनवलं जातं? तिला कमजोर म्हणत तिच्या अब्रुचे धिंडवडे काढले जातात? या प्रश्नाचं उत्तर एक प्रकारचे संभ्रम निर्माण करणारा आहे. महिला तसं पाहिल्यास कमजोर नाहीच आणि तसं कोणीही समजू नये.