शेतीसाठी भांडण? बरं नाही

  • 1.8k
  • 642

शेतीच्या लहानशा तुकड्यासाठी भांडण? हे बरं नाही. शेतकरी शेतीचा महत्वपुर्ण घटक. तो नसेल तर शेती पीकत नाही आणि शेती जर पिकलीच नाही तर अन्न मिळत नाही. त्यादृष्टीनं शेती महत्वपुर्ण आहे. शेतकरी आपल्या शेतात अतिशय काबाडकष्ट करतो. त्यासाठी आपल्या जीवाचं रान करतो. तो शेतात राबराब राबतो. प्रसंगी तसं राबत असतांना त्यांना पोटभर खायला मिळतंच असं नाही. कधीकधी तो उपाशीही राहतो. मात्र शेतीच्या कामात तो दिरंगाई करीत नाही. ते कार्य तो वेळच्या वेळेवर करतोच. जसा आज जर पेरणी करायची असेल तर तो आजच करतो. उद्याची वाट पाहात बसत नाही. कारण त्याला माहीत आहे की आज जर पेरणी केली नाही तर उद्या शेती