ब्लॅकमेल - प्रकरण 4

  • 2.8k
  • 1.8k

प्रकरण ४ पाणिनीने बाहेर जाऊन एक सुटकेस खरेदी केली. नंतर बाहेर फुटपाथ वर एक पुस्तक विक्रेता बसला होता,त्याचे कडून काही पुस्तकं खरीदली.त्या पुस्तकवाल्यालाच विनंती केली की या सुटकेस मधे टाक सगळी पुस्तकं.त्यानंतर तो डेल्मन हॉटेलात आला आणि रिसेप्शनिस्ट ला म्हणाला, “मला आज रात्रीपुरता मुक्काम करायचाय, मला जरा वरच्या मजल्यावरची रूम द्या.ट्राफिक चा आवाज होणार नाही अशी पाचव्या मजल्याच्या वरची द्या.” “ तुम्हाला आज रात्री पुरते राहायचं असेल तर ११८४ नंबरची रूम देतो.नाव काय म्हणालात?” “ पटवर्धन. ११ वा मजला उंच होईल.आठव्यावर नाही का?” पाणिनीने विचारलं. “ त्यावरच्या सगळ्या गेल्या आहेत.” “ सातवा? ” “ एकच आहे, पण ती मोठी आहे