ब्लॅकमेल - प्रकरण 3

  • 3.6k
  • 2.3k

प्रकरण 3 पाणिनी डेल्मन हॉटेलच्या रिसेप्शन मधे गेला आणि विचारलं, “ प्रचिती खासनीस नावाने तुमच्याकडे बुकिंग आहे?” “ आहे ७६७ नंबरची रूम आहे.” आपलं रजिस्टर चाळत रिसेप्शनिस्ट ने उत्तरं दिलं. “ मी आल्याचं तिला कळवालं का प्लीज?” पाणिनीने विचारलं. “ नाव काय आहे तुमचं?” “ ती मला नावाने ओळखत नाही.तिला सांगा, सामाजिक सुरक्षिततेच्या संबंधात काम आहे. १२३-३२१ या नंबरशी संबंधित काम आहे.” रिसेप्शनिस्ट ने संशयित नजरेने पाणिनीकडे पाहिलं आणि रूम ७६७ ला फोन लावला. “ मॅडम, तुम्हाला भेटायला एक गृहस्थ आलेत. सुरक्षिततेच्या संबंधात काम आहे त्याचं.” दोघांचं फोन वर हलक्या आवाजात बोलणं झालं ते ऐकून रिसेप्शनिस्ट पाणिनीला म्हणाला, “मॅडम म्हणाल्या