संस्थाचालक मेहरबान तर गधे पहलवान?

  • 1.9k
  • 743

संस्थाचालक मेहरबान तर गधे पहलवान? *संस्थाचालक म्हटलं तर शाळेचा सुपरवायजरच. शाळा दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा घटक. अलिकडील काळात तो अमूक माझा नातेवाईक व अमूक माझा शत्रू. तसाच देण देणारा माझ्या जवळचा व देण न देणारा माझ्या दुरचा. असा भेदभाव करीत असतो. त्यातूनच शाळेची दुर्गती होत असते. तसं पाहिल्यास त्यानं असा भेदभाव करु नये. शिवाय अलिकडील काळात संस्थाचालक सरकारी नसला तरी त्याला अतिशय महत्व प्राप्त झालेले आहे. तोच शाळेचा खरा सुत्रधारही असतो. तो शाळेला सुगीचे दिवस आणायचे की शाळेची दुर्गती करायची. हे ठरवू शकतो. त्यामुळंच तोच खरा सुत्रधार असल्यानं त्याची मर्जी झाल्यास व तो मेहरबान झाल्यास तोच कुणाला पहलवान तर कुणाला नेस्तनाबूत