सर येते आणिक जाते - 10

  • 2.6k
  • 945

  दोन दिवस आराम करून, औषधपाणी करून प्रथमाला बऱ्यापैकी नॉर्मल वाटू लागले होते. तोंडाला आता चव आली होती. थोडी चालू फिरूही शकत होती. तसेही परवापासून तिला ऑफिसला जाणे गरजेचे होते. त्यामुळे तीही लवकरात लवकर पूर्ण बरी होण्याचा प्रयत्न करत होती. आईलाही तिची तब्बेत पूर्ववत होत असल्याचे बघून बरे वाटत होते. आईने बराच संयम दाखवला होता. पण आज प्रथमाशी बोलणे रास्त होणार होते. संध्याकाळी प्रथमा आणि आई टीव्ही बघत बसल्या होत्या. प्रथमाचा मूडही बरा दिसत होता. आईला हीच योग्य वेळ वाटली विषयाला हात घालण्याची. आईने प्रथमाच्या हातातील रिमोट घेऊन टीव्हीचा आवाज बारीक केला. आणि प्रथमाकडे पाहू लागली. आई प्रथमाला विचारू लागली...