दशानन

  • 4.2k
  • 1.9k

त्याने डोळे उघडले व सगळीकडे बघितले, पण जागा अपरिचित वाटली. त्याने तिरकस नजरेने बाकीच्या डोक्यांकडे बघितले. बाकीची नऊ डोकी अजून झोपली होती. त्यांना झोपलेले बघून त्याला लक्षात आले की तो पुन्हा पृथ्वीवर आला आहे. त्याला चांगलेच ठाऊक होते की पृथ्वीवरच त्यांच्या सोबतचा तालमेल बिघडतो. "अरे आळश्यानों उठा आता पाहाट झाली आहे. सुप्रभात ! बघा सूर्यनारायण पण आपल्या कडे बघत आहेत. आपण भुतलावर आहोत. नेमके कुठे आहोत हे बघावे लागेल." त्याने बाकीच्या डोक्यांना जागवायला हे सांगितले. त्याच वेळेस दुरून एक आवाज आवाज आला. त्याचे कान टवकारले. त्याने ऐकण्यासाठी स्वतःचे लक्ष आवाजावर केंद्रित केले आणि त्याला ऐकू आले 'नारायण नारायण'. त्याला लक्षात