कोण? - 19

  • 3.7k
  • 2.2k

भाग – १९ तीने तो नंबर तीचा फोनवरून डायल केला. समोरचा व्यक्तीचा फोन वाजू लागला होता. फोनची रिंग संपूर्ण काळ वाजली परंतु समोरचा व्यक्तीने फोन उचलला नाही. सावलीने पुन्हा तो नंबर डायल केला पुन्हा फोनची रिंग वाजली आणि वाजत राहिली. मग अचानक त्या व्यक्तीने फोन उचलला आणि हेलो मिस्स सावली असे म्हटले. तो आवाज सावलीचा ओळखीचा नव्हता परंतु त्याने मिस्स सावली म्हटले होते. त्यामुळे सावली एकदम घाबरली होती. कारण कि या आधी निलेशने सुद्धा तीला याच प्रकारे मिस्स म्हणून संबोधले होते. तीला वाटू लागले होते कि निलेश जिवंत तर नाही आहे. तो पुन्हा तीचा आयुष्यात वीष तर मिळवणार नाही ना.