सर येते आणिक जाते - 9

  • 2.8k
  • 1.3k

    प्रथमाला अचानक जाग आली. तिचे डोके अतिशय जड झाले होते. अंग अगदी तापाने फणफणत होते. तिने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. पण लगेच काही तिला डोळे उघडता आले नाही. तापाने फणफणल्यामुळे तिच्या अंगात अजिबात त्राण नव्हता. बेडवरुन उठण्याचा प्रयत्न केला. पण शरीरात अवसान नसल्यामुळे तोही प्रयत्न फसला. नाईलाजाने ती थोडावेळ तशीच पडून राहिली. आता ती जागीच होती. फक्त थोडे अवसान एकवटून डोळे उघडण्याचा प्रयत्न करत पडून राहिली होती. तेवढ्याच पाच ते दहा मिनिटांत कालचा आख्खा दिवस तिच्या डोळ्यांसमोरून गेला.     अस्वस्थपणा, उद्विग्नता, पहिल्यांदांच कामावर असूनही काहीही काम न करता चाल ढकल करत मार्गी लावलेला दिवस, घरी न परतण्याची