शेती व्यवस्थापन - भाग 3

  • 2k
  • 942

झाड लावण्याचा उत्सव साजरा करावा? *छंद वाढवा, झाडं लावा, झाड लावण्याचा छंद वाढवा, हवं तर सेल्फी काढा, प्रसिद्ध व्हा. असे बरेच जण म्हणतात. परंतु केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे असं कोणीच करीत नाहीत. महत्वपुर्ण बाब ही आहे की झाडं लावणं ही आपली महत्वपुर्ण गरज आहे. ती जर आज पुर्ण होत नसेल तर येणाऱ्या काळात तापमानवाढीचा व जीवसृष्टी विनाशाचा संभाव्य धोका टाळता येणे अशक्य आहे.* अलिकडील काळात लोकांना बोलणं आवडतं. प्रसिद्धीही आवडते. त्या प्रसिद्धीसाठी लोकं प्रसंगी काय काय करतात. हे न सांगीतलेलं बरं. प्रसिद्धी मिळविण्यासाठी काही लोकं आपले छंद जोपासत असतात. ज्यात कोणाला नाणे गोळा करण्याचा छंद आहे. तर