स्मशानी किल्ला भाग 1

  • 6k
  • 1
  • 2.9k

स्मशानी किल्ला (कादंबरी) भाग एक अंकुश शिंगाडे तो किल्ला शापमुक्त झाला होता व त्या किल्ल्याला अतूल, सारंग व हेमलतानं शापमुक्त केलं होतं. त्यासाठी त्यांनी भुतांशी व भुतांना उठविणाऱ्यांशी लढाई केली होती जणू आपल्या जीवावर खेळून. त्यात प्रसंगी त्या तिघांनाही मृत्यूच आला असता. परंतु सुदैवं हे की त्या प्रसंगातून ते वाचले होते. तो किल्ला शापयुक्त किल्ला होता. तसं पाहिल्यास त्या किल्ल्यावर भुतं होती व ती भुतंच त्या किल्ल्यावर अधिवास करुन होती. आपला अधिकार जमवून होती. त्याला कारण होतं त्या किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांचं मरणं. त्या किल्ल्यावर राहणारे लोकं व त्या किल्ल्यावरील शासक उपासमारीनं मरण पावले होते. त्याचं कारण होतं किल्ल्याला वेढा पडणं.