स्मशानी किल्ला भाग 2

  • 9k
  • 4k

स्मशानी किल्ला भाग दोन हलधर सांगत होता आपली व्यथा. त्यानं कितीतरी माणसांचा बळी घेतला होता त्या किल्ल्यावर. परंतु आता स्वतःचा जीव जाईल या यातनेनं तो तळपत होता व पोपटासारखा बोलत होता तो सारंग, हेमलता व अतूलसमोर. तसं पाहिल्यास दयाही येत होती त्याची. सारंग आणि हेमलता तर डोळे विस्फारून पाहात होते. तशी हेमलता म्हणाली, "आपण याची दया घेवूच नका. अहो आपण सोडून द्याल तर हा दुसऱ्याच किल्ल्यावर जावून तिथं आपलं बस्तान बसवेल आणि तिथंही पुन्हा भुताची खेळी खेळत पुन्हा लोकांना मुर्ख बनवेल व कित्येक लोकांचा बळी घेईल." ते हेमलताचं बोलणं. त्यावर विचार करतच होता अतूल. तोच हलधर म्हणाला, "नाही हो, मी