मराठेसर देवो भव

  • 3.1k
  • 1
  • 1.1k

मराठे सर देवो भव आठवीच्या वर्गावर मराठेसरांचा संस्कृतचा तास सुरू झालेला ‘हस्तस्य भूषणं दानं सत्यं कंठस्य भुषणं।श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणै: किम् प्रयोजनम्’ फळ्यावर सुवाच्च्य सुंदर अक्षरात हे सुभाषित लिहिलेलं अन् सर तन्मय होऊन मधुरवाणीने ते म्हणून दाखवताहेत. मी आणि अशोक करंदीकर दोघेही बऱ्यापैकी हुषार.आम्ही चटकन सुभाषित लिहून घेतलं आणि गाण्याच्या भेंड्या सुरू केल्या, अर्थात हळु आवाजात! आमचं लक्ष नाही हे सरांना समजलं........“काळे ! तुला उचलून खिडकीतून बाहेर फेकून देईन आणि करंदीकर तुझी काय वळवळ सुरू आहे? बाहेर छपराच्या पाण्याचा झोत पडतो आहे ना... त्या झोताखाली उभा करीन तुला! रहा, दोघेही उभे रहा.” सरांचं शिकवणं पूर्ववत सुरू झालं. नवीन शब्दांचे अर्थ,