सर्कस विश्वातली मुशाफिरी

  • 2.6k
  • 1
  • 1k

सर्कस विश्वातली मुशाफिरी प्रा. श्रीराम काळे दि ग्रेट रॉयल सर्कस सर्कस ही माझ्या माझ्या मर्मबंधातली ठेव. व्यवसाय पेशा निवडण्याची स्वायत्तता आणि संधी दैवाने मला दिली असती तर मी सर्कसमध्ये ट्रपीझ अ‍ॅक्टॅर होणे पसंत केले असते. 1971 ते 1975 दरम्याने रत्नागिरीला कॉलेज शिक्षण सुरु असताना रत्नागिरीला ग्रेट एशियन सर्कस दौऱ्यावर आलेली. मी त्यावेळी काकांकडे आगाशे वाड्यात बिनभाड्याच्या छोटेखानी खोलीत रहायचो . घुडे वठारात काँग्रेस भुवनच्या पिछाडीला सर्कसचा तंबू ठोकायाचे काम सुरु झाल्याचे वृत्त कळल्यापासून मी आणि माझा चुलतभाऊमुकुंदा, त्याचा मित्र गजा घुडे, आमच्याच वाड्यात नाटेकर भटजींकडे राहणारा आमचा सवंगडी (राजापुर भू चा) बाळा पाध्ये अशी आमची फाटावळ सकाळ संध्याकाळ मोकळ्या वेळी