दोस्ती चिपांझीशी

  • 3.1k
  • 1
  • 1.3k

दोस्ती चिपांझीशी (दि ग्रेट रॉयल सर्कस मधिल दिवंगत अ‍ॅनिमल ट्रेनर आणि रिंगमास्टर, कुडाळ तालुक्यातल्या वालावल गावचे प्रोफेसर अर्जुनमामा वालावलकर यांच्याशी ०९/०९/१९९२ रोजी सांगली मुक्कामी झालेल्या गप्पांवर आधारित ) सर्कस वर पुस्तक लेखनाचा माझा बेत ठरल्यावर वेळ मिळेल तेंव्हा सर्कस मुक्कामी असेल तिथे मी जात असे. माझी राहण्याची सोय तंबू नजिकच्या एखाद्या उत्तम हॉटेल मध्ये करण्यात येई. चहा, नाष्टा, नी दुवक्त भोजन मात्र मी सर्कस तंबूतच घेणे पसंत करी. सर्कसमधल्या कलाकारांपासून तो नोकर कामगारांपर्यंत सर्वांचे चहा, नाष्टा नी शाकाहारी/ नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे दर्जेदार जेवण सर्कसच्या रसोईतच बनवले जाई. तीन चार प्रकाराच्या भाज्या, कोशिंबीरी, चटण्या, लोणचे, भात, पुलाव, पुरी किंवा रोटी, नान