अष्टावक्र गीता

  • 4.8k
  • 2
  • 2.2k

अष्टावक्र गीता - अष्टावक्र गीता ही राजा जनक व अष्टावक्र ऋषी यांच्यातील संवाद आहे. जेव्हा राजानी अष्टावक्र ऋषींना पाहिले तेंव्हा ऋषींचे शरिर आठ ठिकाणी वक्र असलेने राजाच्या मनात विचारआला की किती कुरूप मनुष्य आहे हा. तेव्हा त्यांनी आत्मज्ञानाने राजाच्या मनातील भावना ओळखून त्याला सांगितले की हे राजा ! जसे मंदिर तिरके असले तरी आकाश तिरके होत नाही , मंदिर गोल अथवा लांब असल्याने आकाश गोल अथवा लांब होत नाही, कारण आकाशाचा व मंदिराचा कांहीही संबंध नाही. आकाशाला अवयव नाहीत पण शरिराला अवयव आहेत. आत्मा नित्य असून शरिर अनित्यआहे. शरीर वक्र असू शकते पण आत्मा नाही. ज्ञानी माणसाची दृष्टि आत्मदृष्टि असते