सांबरशिंग

  • 3.7k
  • 1
  • 1.1k

सांबरशिंग तब्बल बत्तीस वर्षानी स्वतःच्या मारूतीमधून अशोक मूळगावी हुंबरटला निघालेला. सोबत क्लबमधले उच्चभ्रु मित्र. आजपर्यंत केवळ कथा-कांदबऱ्यांमध्ये वाचलेलं कोकणातलं गाव बघायला, एन्जॉयमेंट म्हणून ! कॉकटेल पार्टी रंगात आली की अशोक आपल्या चौसोपी वाड्याचं रसभरीत वर्णन करायचा. ओसरी,पडवी असलेलं प्रशस्त घर. पायाचे घडीव काळवत्री दगड असलेलं मजबुत उंच जोतं. ओसरीवरचे वेलबुट्टी कोरलेले खैराचे भक्कम खांब. अस्सल सागवानी भव्य तुळया. त्यांच्या दर्शनी टोकांना वर्तुळाकार छेद घेऊन त्यावर कोरलेल्या नागफणा. दर्शनी दिंडी दरवाजाची नक्षीकाम केलेली चौकट. तिच्या मध्यभागी गणपती अन् ऋध्दिसिध्दी कोरलेल्या. शंभर वर्षांची पंरपंरा सांगणारा, कडीपाटाचा, राजांगण असलेला खोतांचा वाडा! ओसरीवर, राजांगणाच्या कडेवर मागील दारी असे तीन शिसवी झोपाळे. राजांगणाजावळच्या झोपाळ्याला खूर