तिसरा मजला मृत्यूचा - भाग 2

  • 3.8k
  • 2.5k

  शिवशंकर पॅलेस इमारतीतील आमच्या ऑफिसवर दुःखाची छटा पसरली होती. वातावरणात एक प्रकारचे भय आणि निराशा जाणवत होती. ऑफिसातील प्रत्येक जण श्रीधरच्या गंभीर अवस्थेबद्दल चर्चा करत होता. इकडे पालनपूरचे जिल्हाधिकारी सातपाल आपल्या केबिनमध्ये चहा पीत बसले होते. आज त्यांच्या मनात आपल्या काही महत्त्वाच्या कामांचे विचार घोळत होते. तेवढ्यात त्यांच्या मागे त्यांचा पी. ए. जय एक देशभक्तीपर गाणे गात आला व सातपाल साहेबांची केबिन पुसायला लागला. सातपालसाहेब जयशी गप्पा मारत होते तेवढ्यात त्यांना एक फोन आला. साहेब, शिवशंकर पॅलेसमधील एका कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. सातपाल म्हणाले, “काय??.. शिवशंकर पॅलेस इमारतीमध्ये माझा भाऊ श्रीधर काम करतो. त्याला नाही ना झाली आहे