एक सैतानी रात्र - भाग 24

  • 2.2k
  • 780

S 2 13भाग 24 माने साहेब बंळवंतरावांच्या बंगल्याची चौकट ओलांडून बाहेर आले होते त्यांना आपल्या नजरेसमोर एक खुर्ची दिसत होती.त्या खुर्चीत एक पाठमोरी आकृती मानखाली घालून बसली होती -जणु झोपलीच असावी अशी! माने साहेबांनी हातात पकडलेली रिव्हॉलव्हर त्या आकृतीवर ताणून धरली होती,त्याच अवस्थेत माने साहेबांनी त्या खुर्चीला वळसा घातला व पुढे आले. तसे त्यांना दिसल. खुर्चीमध्ये सब इंन्स्पेक्टद भालचंद्र रावत खाली मान घालून होते. त्यांची नजर पुढे असलेल्या टेबलावर पडली- एक दारुची बाटली आणि दोन ग्लास दिसले. " इंन्स्पेक्टर रावत!" रिव्हॉलव्हर डाव्या हातात घेऊन उजवा हात त्यांनी भालचंद्रच्या खांद्यावर ठेवला. " रावत शुद्धीवर आहेस का ?" माने साहेबांचा आवाज ऐकून