झाडं पर्यावरणाचे रक्षक?

  • 2.2k
  • 822

झाडं हीच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवू शकतात? पशूपक्षांनाही पाणी पाजावे. झाडं लावावीत. कारण ते सृष्टीचे रक्षकच. ते आहेत. म्हणूनच आपल्याला कोणतेही आजार जास्त प्रमाणात शिवत नाहीत. हे तेवढंच खरं. आपण लहान होतो, तेव्हा अंगणात नेहमीच चिमण्या कावळे दिसायचे. शिशीर संपताच वसंत लागला की हिरवे हिरवे राघू दिसायचे. सांज झाली की झुंडीच्या झुंडीनं बगळे चिंचेच्या झाडावर यायचे व अंगणातच चिंचेची झाडं असल्यानं त्यांच्या आवाजानं रात्रभर झोप लागायची नाही. रानात गेलं तर रानपक्षी अविरतपणे रानात हुंदडत असायचे आणि पावसाळ्यात डोबकं भरलंच तर त्या डोबक्यात नित्यनेमानं पाणकोंबड्या थयथय नाचायला येत. शिवाय टिटवीही टिवटिव करीत बैलांच्या अंगावर बसून किडे खात असायची. तुरीच्या झाडात अलगद