पृथ्वी सुखी करुया. तापमान घटवूया

  • 2.3k
  • 981

पृथ्वीला सुखी करुया? तापमान घटवूया पैसे हे जीवन आहे असं सर्वजण म्हणतात तसंच पैसे वाचवा असंही सर्वजण म्हणतात. कारण पैसा नसेल तर कोणतीही कामं होत नाही. पैशाच्या बद्दल सांगायचं झाल्यास पैसा माणसानं कमवावा. तो तेवढाच कमवावा की जेवढा आपल्याला आवश्यक असतो. कारण कोणाजवळ कितीही पैसा असला तरी कोणताही व्यक्ती तो पैसा मृत्यूनंतर आपल्यासोबत नेत नाही. तसंच पर्यावरणाचंही आहे. पाणी हे जीवन आहे असे सर्वजण म्हणतात. तसंच पाणी वाचवा असं सर्वजण म्हणतात आणि तसं म्हणावंच लागतं. पाणीच नाही तर पर्यावरणाचंही संरक्षण करायलाच हवं. पर्यावरणात वनस्पती, प्राणी, माणसं, नैसर्गिक संसाधनं, खनिज संपत्ती, लहानमोठे जीवजंतू, अंतराळ आणि इतर सर्व गोष्टींचा समावेश होत असतो.