बदफैली - भाग 1

  • 9.9k
  • 1
  • 4.9k

  "शी..बाई आज खूपच उशीर झाला. अशोक जर माझ्या आधी घरी आला असेल तर काही खर नाही आज माझं" अपर्णा स्वतःशीच बडबडत झपझप चालत होती...  "तरी मी सोहमला म्हणाले , मला हे असं खोटं बोलून नाही जगता येत, तू कर काही तरी मी नाही आता अशोकशी खोटं बोलणार.. पण त्याच आपलं एकच मला थोडं सेटल होत देत, नंतर आपण आहोतच कि, एकत्र आयुष्यभर पण माझी मनस्थिती का नाही हा समजून घेत माझी होणारी घुसमट नाही का दिसत सोहम ला कि सर्व कळत असूनही तो न कळल्या सारख करतोय” अपर्णाच घर अगदी चार पाउलांवर आलं होत, अशोक आधीच घरी येऊन बसला