सर येते आणिक जाते - 4

  • 3.7k
  • 2k

प्रथमाचा कॉलेजचा आख्खा ग्रूप मस्त तयारी करून संपूर्ण दिवस मजा मस्ती करण्याच्या दृष्टीने सज्ज होऊन तिला सहलीला सोबत घेऊन जाण्यासाठी तिच्या घराबाहेर गाडी घेऊन तिची वाट पाहत थांबला होता. समन्वयीने प्रथमाला कॉल केला. प्रथमा वेळेची किती पक्की होती हे सर्वांना माहित होते. त्यामुळे दुसऱ्याच रिंगला प्रथमाने फोन उचलला आणि पुढच्या दोन मिनिटांत ती आणि तिची आई गेटपशी उभ्या होत्या.प्रथमाने सगळ्यांना हाय केले. तितक्यात समन्वयीने गाडीचा दरवाजा आतून उघडला. प्रथमाने आपला बॅगपॅक गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवून डिक्की बंद केली आणि मधल्या सीटवर, समन्वयीच्या शेजारी येऊन बसली. प्रथमाची आई तिला सी ऑफ करण्यासाठी घराच्या गेटपाशी उभी होती. आईला बाय करून प्रथमा डिटॉक्स, रिजुविनेट