वस्तू स्वस्त व्हाव्यात?

  • 1.9k
  • 1
  • 870

वस्तू स्वस्त व्हाव्यात? सध्याचा काळ पाहिल्यास बऱ्याच वस्तू ह्या महाग झालेल्या आहेत. ज्यात तेल, साखरच नाही तर स्वयंपाकाचा गॅसही महाग झालेला आहे. टिव्ही, मोबाईल रिचार्जचे दर वाढलेले आहेत. ज्याची सामान्य माणसांना जाणीवही नाही. मोबाईल रिचार्ज ही आजच्या काळातील माणसांची महत्वपुर्ण गरज ठरलेली आहे. जर मोबाईलमध्ये पैसे नसतील तर आपल्याला घरी करमतच नाही अशी आपली अवस्था बनलेली आहे. त्यातच कधीकधी पुर्वीचा काळ आठवतो. पुर्वी दहा रुपयाचा रिचार्ज मारावा लागायचा व त्या दहा रुपयात मिसकॉल दिला जायचा व मिसकॉल देताच पुढील व्यक्तीला गरज असेल तर तो जेवढं बोलायचं, तेवढं बोलून घेत असे. त्या रिचार्ज पद्धतीत पती पत्नींना बराच फायदा होता. तसाच फायदा