हंसगीता

  • 4.4k
  • 1.8k

हंसगीताएकदा युधिष्ठिरानी पितामहांना विचारले, जगात सर्व लोक विद्वत्ता, सत्य, इन्द्रियसंयम, क्षमा व उत्तम बुद्धिची स्तुती करत असतात. यावर आपले मत काय आहे. पितामह म्हणाले, या विषयावर साध्यदेवता आणि हंसामधील संवाद मी तुला सांगतो.प्रजापती हंसरुप धारण करून विहार करत असतां, साध्यदेवतांची व त्यांची भेट झाली. साध्यदेवता म्हणाले, तुम्ही मोक्षतत्वाचे ज्ञानी आहात, आपण पण्डित व उत्तम वक्ता आहात.हे पक्षिश्रेष्ठ, आम्हाला सांगा की, आपल्या मते सर्वश्रेष्ठ काय आहे?. मन कशात रमते?. काय केले असता जीवाला सर्व बंधनातून सुटका मिळेल ते आम्हाला सांगा.हंस म्हणाले, तप, इन्द्रियदमन, सत्य भाषण आणि मनोनिग्रह महत्त्वपूर्ण आहेत. आपण कोणत्याही गोष्टीने आनंदित अथवा दुःखी होऊ नये. शब्द बाणासारखे असतात आणि