जोसेफाईन - 10

  • 4.2k
  • 2.1k

काही वेळातच त्यांचे दोन शिष्य फ्लॅट नंबर 1002 मध्ये आले. त्यांच्या हातात दोन पिशव्या होत्या. गुरुजींनी त्यांना नजरेनेच खुणावले तशे ते भराभर कामाला लागले. बैठकीत त्यांनी पिठाने एक रिंगण तयार केलं. त्या मध्ये एक लाकडी पाट मांडला. त्यानंतर त्यांनी एका बाटलीतील अभिमंत्रित पाणी त्या रिंगणाभोवती शिंपडलं. आता गुरुजी त्या रिंगणा बाहेर एक पाट मांडून बसले. त्यांनी काही क्षण डोळे मिटून काही मंत्र म्हंटले. काहीवेळातच त्या बैठकीत उग्र घाण वास येऊ लागला. सगळ्यांनी नाकाला हात लावला. आता त्या रिंगणात एक धूसर आकृती निर्माण होत होती आणि काही क्षणातच तिथे जोसेफाईन उभी राहिली. अत्यंत विद्रुप दिसणारी जोसेफाईन गुरुजींकडे न बघता खाली बघत