वाचन

  • 3.7k
  • 1.3k

             जगामधील कोणत्याही थोर व्यक्तींना डोळयासमोर धरुन पहा. त्या सर्वांना वाचनाची आवड होती. वाचनाने त्यांचे विचार प्रगल्भ झाले. वाचनानेच त्यांना ज्ञान प्राप्त झाले. कोणताच माणूस परिपूर्ण नसतो. ज्ञानच त्याला परिपूर्ण बनवत असते. आपल्याकडे दिवसाचा अर्धा वेळ मोबाईलवर वाया घालणाऱ्या लोकांना मात्र वाचनासाठी वेळ नसतो. किंवा काही माणसांना काम नसल्याने दिवस खूप मोठा जातो.             एके दिवशी वाचनालयातून पुस्तक घेऊन मी घराकडे जात होतो. तेवढ्यात मला माझा एक मित्र भेटला.              मी विचारले, "कुठे चाललास?" तो म्हणाला,              "वेळ कटत नाही म्हणून जरा फेरफटका मारायला बाहेर चाललो आहे."              मी त्याला माझ्याकडील एक पुस्तक दिले. एक