किमयागार - 41

  • 2.2k
  • 948

किमयागार - वारातुमच्या मनात प्रेमभावना असेल तर तुम्ही काहीही करू शकता. घटना घडत जातात. माणूस वारा बनू शकतो, अर्थात वाऱ्याने मदत केली तरचं.खरेतर हे बोलणे वाऱ्याला विचित्र वाटत होते. त्याने आपला वेग वाढवला, वाळू उंच उडू लागली, पण त्याला कळले की, आपण जरी असे केले तरी, माणसाला वारा कसे बनवायचे आपल्याला माहीत नाही. आणि प्रेमाबद्दल काही माहिती नाही. वारा म्हणाला, मी माझ्या प्रवासात लोकांना प्रेमाबद्दल बोलताना आणि आकाशाकडे बघताना पाहीले आहे. तो आता स्वतः वर रागावला होता. त्याला त्याच्या मर्यादा कळल्या होत्या. तो म्हणाला आपण आकाशाला विचारून बघुया.तरुण म्हणाला, या जागेवर असे वादळ उठव की सूर्यपण दिसला नाही पाहिजे, मी