डॉक्टर बाबासाहेब खरंच प्रेरणास्थानच

  • 2.3k
  • 1k

अछूत शब्दानंच केलीया क्रांती? चौदा एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. याच दिवशी महू इथं भीमाबाईच्या पोटी बाबासाहेबांचा जन्म झाला. बाबासाहेब हे लहानपणापासूनच क्रांतीकारी विचारांचे होते. म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. बाबासाहेबांच्याही बाबतीत तसंच झालं. बाबासाहेब जेव्हा लहान होते, तेव्हा ते निरीक्षण करायचे. निरीक्षण करायचे की त्यांच्या समाजाला समाजात निश्चीतच चांगलं वागवलं जात नाही. भेदभाव व विटाळ आहे समाजात. आपलाच समाज, ज्यांचं रक्त, मांस व हाड एकच आहे. तो आपला समाज एकमेकांबद्दल आपसात विटाळ बाळगतो. माणसाला माणूस म्हणून जगू देत नाही. याचं कारण काय असावं? ते त्यांना लहानपणी कळत नव्हतं. त्यातच ते जेव्हा सवर्णांच्या मुलांना खेळतांना पाहात, तेव्हा त्यांचीही