पती पत्नी वादातील हेही एक कारण? आज आपण पाहतो की पती पत्नीची फारच भांडणं वाढलेली आहेत. नवऱ्याला त्याच्या पत्नीचं पटत नाही व पत्नीला त्याच्या पतीचं पटत नाही. मग वाद उत्पन्न होतात. त्यानंतर वाद एवढा मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतो की ते वाद चव्हाट्यावर येतात. पुढं न्यायालयात जातात. त्यानंतर ते वाद न्यायालयात गेल्यावर त्यात आरोपाच्या फैरी झडत असतात. भांडणारी मंडळी एकमेकांवर असे गंभीर आरोप लावत असतात की त्यानंतर तसे आरोप न्यायालयात ऐकणंही होत नाही. *पती पत्नीतील वाद कसे उत्पन्न होतात?* पती पत्नीतील वाद उत्पन्न होण्यामागील महत्वपुर्ण कारण म्हणजे स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्याची भावना. पत्नीला वाटत असते की तिच्या सासरची सर्व मंडळी माझ्याच