किमयागार - 38

  • 2.5k
  • 1.1k

पृथ्वीवरील प्रत्येकासाठी त्याचा खजिना वाट बघत असतो. पण माणूस शोध घ्यायला तयार नसतो.माणसे त्याबद्दल बोलतात, पण ते‌ नंतर आयुष्य जसे पुढे जाते तसे जाऊ देतात, जिकडे नेईल तिकडे.आणि दुर्दैवाने फारचं थोडे लोक त्यांना आखून दिलेल्या मार्गावर चालतात, त्यांचे भाग्य मिळवण्याचा आणि त्यांना आनंद मिळवून देणारा मार्ग.बरेच लोक जगाकडे भीतीयुक्त नजरेने पाहतात आणि त्यांना हे जग एक भयंकर ठिकाण वाटू लागते.आणि आम्ही ह्रदये खुप मृदुपणे बोलतो, आम्ही बोलणे थांबवत नाही आणि आपले शब्द ऐकले जाणार नाहीत अशी आशा करतो, आम्हाला असे वाटते, माणसाला ह्रदयाचे न ऐकल्याने दुःखाची वेळ येउ नये.तरुण किमयागाराला म्हणाला, ह्रदय माणसाला स्वप्न पूर्तीसाठी प्रयत्न करायला का सांगत नाही?