प्रत्येकांनी मतदान करावं

  • 1.9k
  • 774

*प्रत्येकांनी मतदान करावं?* *आज आपण पाहतो की देशात वेगवेगळ्या पक्ष संघटना आहेत. वेगवेगळे पक्ष आहेत व वेगवेगळ्या पक्षाच्या संघटना व कार्यकर्ते आपल्या वक्तव्यानं एकमेकांवर विचारांची आगपाखड करत असतात. ते एवढे घाण बोलत असतात की वातावरण गढूळ होवून जातं. विशेष म्हणजे त्या गोष्टीची काय गरज आहे. कुणी कुणावर का बरं आगपाखड करावी? त्यानं काय मिळतं? काहीच नाही. कोणी जे काम केलं नाही, त्या कामाची देशाचा विकास करीत असतांना उकारे पाकारे काढायची गरज नसते. त्यानंच अस्थिरता निर्माण होते. विचार केला पाहिजे की आपण त्यापेक्षा चांगलं काय करु शकतो. त्यादृष्टीनेच पावलं टाकत गेलो पाहिजे आपण. तरंच देशात शांतता टिकून राहू शकते यात दुमत