मला स्पेस हवी पर्व १ - भाग ६२

  • 2.1k
  • 1.1k

मला स्पेस हवी पर्व १ भाग 62   त्यादिवशी दुपारी अनुराधा नेहाचं जेवण आटोपून समोरच्या खोलीत गेली. त्यानंतर नेहा झोपण्याचा प्रयत्न करत असतानाच तिचा फोन वाजला फोनवर सुधीर नाव दिसताच नेहाच्या कपाळा वर आठी आली तरी नेहाने फोन घेतला.     “हॅलो”   नेहा बोलते. नेहाचा थकलेला आवाज ऐकून सुधीर काळजीने विचारतो.   “नेहा काय झालं? तुझा आवाज असा का येतो आहे?”   सुधीर च्या आवाजात काळजी होती.   “काही नाही. थोडा ताप आलाय एवढच.”   नेहा अलिप्त राहून बोलत होती पण तिकडे सुधीरला नेहाची काळजी वाटायला लागली.   “ नेहा अगं तिथे तू एकटी आहेस. कोण आहे तुझी सेवा