मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५९

  • 2.1k
  • 975

मला स्पेस हवी पर्व १ भाग 59   मागील भागात आपण बघितलं की रमण शहाला काहीतरी सुचतं ते काय सुचतं ते आता या भागात बघू   सकाळी नेहा आज जरा फ्रेश वाटत होती तरीही पाचसहा पावलं चालल्यावर तिला दमल्यासारखं व्हायचं. अपर्णाला काळजी वाटली म्हणून तिने डॉक्टरने फोन करून विचारलं.   “ डाॅक्टर नेहा मॅडमना अजूनही थकवा आहे.”   तेव्हा डॉक्टर म्हणाले,   “ व्हायरलचा विकनेस खूप दिवस टिकतो. त्यांची काळजी घ्या.”     नेहाला सकाळी समोरच्या खोलीत बसून टीव्ही बघावा असं आज वाटत होतं. तसं तिने अपर्णाला बोलून दाखवलं,   “ अपर्णा मला समोरच्या खोलीत जाऊन बसावसं वाटतय पण दमल्या