मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५६

  • 2.2k
  • 1
  • 1.1k

मला स्पेस हवी पर्व १ भाग 56   मागील भागात आपण बघितलं की नेहा जाहिरातीचं शूटिंग बघायला जाते पण तिथे कंटाळते म्हणूनच नेहा आणि अपर्णा निघून येतात. रमणशहाचा त्यादिवशी असलेला प्लॅन पूर्ण फिसकटतो.आता काय होईल पुढे ते बघू.   कॅब मध्ये बसली असताना बऱ्याच वेळ नेहा आपल्याच विचारात असते. तिला बघून अपर्णाला सारखं मनातून वाटत असतं की आपण रमण शहाबद्दल नेहाला सांगूया. पण कसं सांगायचं? हा तिच्यापुढे प्रश्न असतो. कारण आजही रमण शहा च्या पद्धतीने नेहाशी बोलत होता ते बघून अपर्णाच्या लक्षात आलं की तो नेहाला आपल्या बाजूला करू बघतो आहे. जर का त्याची जादू चालली तर नेहा मॅडम रमणशहाला