मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५३

  • 2.5k
  • 1.2k

मला स्पेस हवी पर्व १ भाग 53   मागील भागात आपण बघितलं की रमण शहा नेहावर लुग्ध झालेला आहे आणि तो नेहाशी बोलण्याचा प्रयत्न करतोय रमण शहा स्मार्ट माणूस आहे. नेहाला मात्र या सगळ्याची काहीही कल्पना नाही आता पुढे काय घडतंय बघू     सकाळी नेहा नेहमीप्रमाणे उठली. ती दूध तापवून चहा करायला घेणार तेवढ्यात तिच्या मोबाईलचा मेसेज टोन वाजला. मेसेज टोन वाजला तसं तिने बघितलं त्याच्यावर रमण शहाचं नाव दिसलं तिला आश्चर्य वाटलं इतक्या सकाळी याने आपल्याला का मेसेज करावा? काल तर आपली ओळख झाली. नेहा कोणाच्या समोर समोर करणारी मुलगी नसल्यामुळे रमण शहाचा डाव तिच्या लक्षात आला नाही.